सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
तालुक्यातील मोर्वे गावात विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात दुर्दैवी घटना घडली असून, मेंढपाळ शेतकरी अमोल गोपाळ धायगुडे यांच्या शेळीच्या कळपावर वीज पडून तब्बल ९ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक मेंढी गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास परिसरात अचानक ढगांचा कडकडाट सुरू झाला. त्यावेळी धायगुडे हे आपल्या शेळीच्या कळपासह शेतात होते. अचानक विजेचा प्रहार झाल्याने कळपातील ९ शेळ्या जागीच ठार झाल्या, तर एक मेंढी गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. जखमी मेंढीवर सध्या उपचार सुरू असून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातून होत आहे.
