सुपे परगणा l बाबुर्डी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रकाश लोणकर यांची बिनविरोध निवड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील विविध विकास सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रकाश तुकाराम लोणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापुर्वीचे अध्यक्ष संतोष पोमणे यांनी राजीनामा दिल्याने या रिक्तपदी प्रकाश लोणकर यांची निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अमर गायकवाड यांच्यासह सचिव अभिजित काळखैरे, सह सचिव प्रमोद देव, दत्तात्रय लडकत आदींनी काम पाहिले.
याप्रसंगी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अरुण सकट, माजी उपसभापती निलेश लडकत, सरपंच दत्तात्रय ढोपरे, माजी अध्यक्ष संतोष पोमणे, उपाध्यक्ष सुनील शिंदे, संचालक शांताराम ढोपरे, नानासो लडकत, माजी सरपंच शिवाजी लव्हे, उत्तम लडकत, सिंधू लव्हे, अनिता लव्हे, दत्तात्रय लडकत, प्रितम लोणकर, डी. जे. लडकत आदी उपस्थित होते. 

येथील संस्थेचे १ हजार ११ सभासद असुन ८५ लाखाचे भाग भांडवल आहे. या संस्थेने आजपर्यंत १ कोटी ५० लाखाचे कर्ज वाटप केले असल्याची माहिती सह सचिव प्रमोद देव यांनी दिली. 
  
Tags
To Top