Rajgad News l अडवलीत महिला दिनाचा जागर..! आरोग्याबाबत जनजागृती आणि कर्तृत्ववान महिलांचा गौरव

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
राजगड : मिनल कांबळे 
ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या आरोग्य विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन सोनाली सुतार यांनी केले
जागतिक महिला दिनानिमित्त अडवली येथे महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) यांच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सोनाली सुतार बोलत होत्या, ग्रामीण भागातील महिलांची आमच्याकडे निमित्त दुर्लक्ष होत असते महिलांसाठी आरोग्य हे खूप महत्त्वाचे आहे तरी ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या लक्ष दिले पाहिजे असे मत यावेळी सुतार यांनी व्यक्त केले,
 कार्यक्रमाचे अध्यक्ष मासूम संस्थेच्या मीना शेंडकर प्रमुख पाहुणे म्हणून कविता निकम या उपस्थित होत्या. व इतर वक्त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी आपल्या प्रगल्भ विचारातून महिलांना मार्गदर्शन केले. कुठल्याही महिलेवर हिंसा होता कामा नये. प्रत्येक महिलेला उत्तम आरोग्यदायक आणि आनंदी जीवन जगता आले पाहिजे असा संदेश दिला. यावेळी मासूमच्या कार्यकर्त्यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित सर्वाइकल कॅन्सर या विषयावर पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मालन झगडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना मराठे यांनी केले तर आभार नसरीन तांबोळी यांनी मानले. या कार्यक्रमाचे नियोजन सुनंदा खेडेकर, मंगल कुंजीर, ज्योती चौंडकर, शुभांगी गोळे, स्वाती बांदल, पवनराज पाटील, भाग्यश्री वालगुडे, विद्या जाधव,पायल हजारे, मुक्ता, वैशाली, मोनाली, कावेरी, छाया, कविता, कल्याणी यांनी केली.

या कार्यक्रमांमध्ये आदिवासी समाजाच्या तीन महिला (मंगल वाघमारे, पार्वती मुकणे, माया हीलम) ज्यांनी त्यांच्या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांचे डॉक्युमेंट काढण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांच्या समाजाला वेळोवेळी मदत करतात त्यांना पुष्पगुच्छ आणि संस्थेची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर तालुक्यातील राष्ट्रीय स्तरावर खेळणारी कुस्तीपटू सलोनी खोपडे तिचा देखील पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
To Top