सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
गुळुंचे ता. पुरंदर येथील सुभाष दादासाहेब निगडे यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते 56 वर्षांचे होते.
मूळ गुळुंचे ता. पुरंदर येथील रहिवासी असलेले निगडे हे गेल्या अनेक वर्षांपासून कामानिमित्त बारामती येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पाश्चात एक भाऊ, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.
बारामती व इंदापूर सुपर्वयझिंग युनियनचे मा. अध्यक्ष शहाजी जगताप यांचे ते मेहुणे होत. तर बारामती तालुका शिवसेनेचे अध्यक्ष स्वप्नील जगताप यांचे ते मामा होत.
