Baramati Crime | कौटुंबिक वादातून पुतण्याचा चुलत्यावर कु-हाडीने हल्ला; चुलता गंभीर जखमी : मुढाळे येथील प्रकार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुढाळे (जायपत्रेवाडी) येथे कौटुंबिक वादातून मारहाण आणि पुतण्याने चुलत्यावर कु-हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून यात एक जण गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैताली राहुल जायपत्रे (वय 33, रा. जायपत्रेवाडी मुढाळे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजित सदाशिव जायपत्रे व शितल अजित जायपत्रे (दोघे रा. जायपत्रेवाडी मुढाळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 6 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजता फिर्यादी त्यांच्या घरासमोर असताना आरोपी अजित जायपत्रे याने “तुझा नवरा माझ्या पत्नीवर का संशय घेतो?” असे म्हणत फिर्यादीच्या पतीस फोनवरून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपी अजित जायपत्रे याने फिर्यादीचा मोबाईल तिच्या चेहऱ्यावर फेकून मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे सासरे सुनिल चंदर जायपत्रे हे मोटारसायकलवरून घरी येत असताना, आरोपी अजित जायपत्रे याने कु-हाडीने त्यांच्या डाव्या हाताच्या कोपराजवळ, मनगटाजवळ तसेच छातीच्या डाव्या बाजूस वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड करीत आहेत.
To Top