Indapur News l पश्चिम इंदापूरमध्ये शेतीच्या वीजपुरवठ्यात दोन तासांची कपात; शेतकरी आक्रमक

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
इंदापूर : संतोष माने 
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात आज शेतीची वीज पुरवठा हा आठ तासाहून कमी करून सहा तास केला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत. एकीकडे उन्हाची तीव्रता, पाण्याची टंचाई, त्यातच वीज पुरवठा दोन तास कमी केल्याने आम्ही करायचे काय ? 
असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. महावितरण ने शेतीचा दोन तास कमी केलेला वीस पुरवठा सुरळीत किंवा पूर्वीप्रमाणे आठ तास न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उजनी धरण बचाव कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी दिला आहे.
 त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले , एकीकडे उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे, तुटपुंज स्वरूपात विहिरींमध्ये पाणी आहे, असे असताना महावितरण कंपनीने आजपासून शेतीसाठी सहा तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढे असूनही सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे असलेलें ‌ पाणी देण्यास सुद्धा शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे वीस पुरवठा कमी करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणे हा प्रकार आहे. याबाबत महावितरण कंपनीने पूर्वीप्रमाणे शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा अरविंद जगताप यांनी दिला आहे. शेतीसाठी आठ तासांना ऐवजी सहा तास वीज पुरवठा करण्यात येत असला तरी, दोन तास वीजपुरवठा कशामुळे कमी केला हा प्रश्न मात्र अनोत्तरित आहे.
To Top