Baramati Crime l बारामतीत विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : प्रतिनिधी 
विवाहितेला माहेरून पैसे आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे व नणंदेविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा विवाह सन २०१४ मध्ये मळद येथील प्रसाद प्रताप गावडे याच्यासोबत हिंदू रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. विवाहानंतर काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. मात्र, २०१८ पासून पती प्रसाद गावडे याने “तुझ्या माहेरून पैसे घेऊन ये, मला जमीन घ्यायची आहे, तुझे आई-वडील दारिद्र्य आहेत,” असे म्हणत मानसिक त्रास देण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 
तसेच, दीर प्रभाकर गावडे, सासू प्रतिभा गावडे आणि जाऊबाई पंचशीला गावडे यांनीही महिलेला वेळोवेळी माहेरून पैसे आणण्याची मागणी करून शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपींनी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादी महिलेने यापूर्वी माहेरून ७० हजार रुपये आणून दिल्याचे सांगितले आहे. तसेच, १७ मे २०२५ रोजी मुलाच्या शिक्षणासाठी ३० हजार रुपये आणण्याची मागणी करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, २३ मे २०२६ रोजी संबंधित विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. तिच्या मोबाईलमधील WhatsApp चॅट व इतर माहितीच्या आधारे छळ होत असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी प्रसाद प्रताप गावडे, प्रतिभा प्रताप गावडे, प्रभाकर गावडे आणि पंचशीला गावडे (सर्व रा. मळद, ता. बारामती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हवालदार विलास मोरे करीत आहेत.
To Top