Rajgad News l संत सोपानकाका ‘सुंदर माझी शाळा’ अभियानात ड्रिमलॅन्ड इंग्लिश स्कूलचा द्वितीय क्रमांक

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
राजगड : मिनल कांबळे 
संत सोपानकाका सहकारी बँक व संत सोपानकाका फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘संत सोपानकाका सुंदर माझी शाळा’ अभियानात राजगड तालुक्यातील मालवली येथील विश्वा फाऊंडेशन संचालित ड्रिमलॅन्ड इंग्लिश स्कूलने तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
या अभियानातील यशस्वी शाळांच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, माजी आमदार संजय जगताप, राजेंद्र जगताप तसेच पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांच्या हस्ते ड्रिमलॅन्ड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका तृप्ती शिळीमकर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी शाळेच्या सहशिक्षिका राणी दिघे, मिनल रणखांबे, नम्रता भगत, उज्वला वाडघरे, किरण भिलारे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेच्या या यशाबद्दल माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर आणि विश्वा फाऊंडेशनच्या संचालिका सुप्रियाताई दसवडकर यांनी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
To Top