सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी किसन तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मिलिंद कांबळे यांनी आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली.
सोमेश्वर कारखान्याच्या जिजाऊ सभागृहात दि. ११ रोजी संचालक मंडळाची बैठक पार पडली यावेळी उपाध्यक्षपदी तांबे यांची निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार बारामतीचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी नावाची घोषणा केली.
यावेळी उपाध्यक्ष पदाला किसन तांबे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बारामतीचे सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे यांनी काम पाहिले.
यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, मावळते उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक राजवर्धन शिंदे, ऋषि गायकवाड, लक्षण गोफणे, सुनील भगत जितेंद्र निगडे, आनंदकुमार होळकर, शांताराम कापरे, बाळासाहेब कामठे, अनंत तांबे, शैलेश रासकर, प्रणिता खोमणे, विश्वास जगताप, हरिभाऊ भोंडवे, तुषार माहुरकर कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सचिव कालिदास निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
