Baramati News l होळ गावात कृषी दिन व 'खेती बचाव' अभियान उत्साहात; सेंद्रिय शेतीचा दिला संदेश

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : सोमेश्वरनगर
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामतीच्या रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी गुरुवारी (२ जुलै) होळ (ता. बारामती) येथे कृषी दिन आणि 'खेती बचाव' अभियान उत्साहात साजरे केले. या उपक्रमातून शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती, शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक कृषी पद्धतींबाबत जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे विषय विशेषज्ञ संतोष गोडसे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी व्ही. आर. निंबाळकर, कृषी पर्यवेक्षक निलेश गोळे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र विभागातील कृषी सहाय्यक मनोहर जाधव, होळचे सरपंच सुरज कांबळे, उपसरपंच रमेश वायाळ तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे उपस्थित होते.

मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सेंद्रिय शेतीचे महत्त्व, मातीचे आरोग्य जपणे, रासायनिक खतांचा संतुलित वापर, नैसर्गिक शेतीचा स्वीकार आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शाश्वत शेती विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. शेती वाचविण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी विद्यार्थिनींकडून शेतकरी बांधवांना गवार पिकाच्या बियांचे वाटप करण्यात आले. खरीप हंगामात गवार लागवडीला प्रोत्साहन देण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

या उपक्रमात सानिका चौगुले, अनुष्का दाभोळे, तन्वी जगताप, संचिता कांबळे, राशी खुसपे, तेजल राऊत आणि अमृता सातपुते यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाला शेतकरी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थिनींच्या जनजागृतीपर उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळून शाश्वत शेतीला चालना मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
To Top