Baramati News l होळच्या जि. प. शाळेत पोषण परसबाग संकल्पनेचे प्रात्यक्षिक

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कृषी महाविद्यालय, बारामतीच्या रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत होळ येथील जिल्हा परिषद वायाळपट्टा शाळेमध्ये 'पोषण परसबाग (Nutritional Garden)' या संकल्पनेवर प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
         या उपक्रमामध्ये कृषीकन्यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना घरच्या घरी उपलब्ध जागेत पोषण परसबाग उभारण्याचे महत्त्व, संतुलित आहारासाठी आवश्यक असलेल्या पालेभाज्या व भाजीपाला पिकांची लागवड, सेंद्रिय खतांचा वापर तसेच दैनंदिन आहारात ताज्या भाज्यांचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून पोषण परसबागेबाबत माहिती जाणून घेतली.
     कार्यक्रमास विलास काटे , सविता काटे, .बबिता डोडमसे , आशाताई वायाळ व शुभांगी कारंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना शाळा तसेच घरच्या परिसरात पोषण परसबाग उभारून निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा. शिंदे यांच्या कडून करण्यात आले.
कृषी महाविद्यालय, बारामतीच्या रावे विद्यार्थीनी सानिका चौगुले, अनुष्का दाभोळे, तन्वी जगताप, संचिता कांबळे, राशी खुस्पे, तेजल राऊत, अमृता सातपुते यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून पोषण परसबागेची संकल्पना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि रावे विद्यार्थिनींचे मोलाचे सहकार्य लाभले.
To Top