Bhor News l पुणे मॉडेल स्कूल' उपक्रमातून भोर तालुक्यातील शाळांचे बदलणार रूपडे

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
प्रतिनिधी : संतोष म्हस्के 
     जिल्हा परिषद शाळांचे शिक्षण उच्च दर्जाचे असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी “पुणे मॉडेल स्कूल“ उपक्रम राबविला जात आहे.उपक्रमांतर्गत कारी-उत्रौली ता.भोर गटातील अनेक नवीन इमारतीचे व आवश्यक आवश्यक तेथे इमारत दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहेत.लवकरच शाळांचे रूपडे बदलणार असल्याचे मत स्वरूपात होते यांनी व्यक्त केले. 

     उत्रौली - कारी गटातील शाळा भेट दौऱ्यात ग्रामस्थांशी संवाद साधताना जि.प.सदस्या थोपटे बोलत होत्या. या उपक्रमांत आंबाडे, नेरे, धावडी, बाजारवाडी, शिरवली तर्फे भोर, आंबेघर, करंजे, कारी चौका, नाझरे, आंबवडे, कर्नावड, कोर्ले या शाळांचा समावेश आहे.यावेळी सदस्या तथा आरोग्यवर्धिनी स्वरूपा थोपटे, पंचायत समिती सदस्या गीतांजली आंबवले, सुषमा चव्हाण यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी, गावातील ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर शाळांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. 

दरम्यान नवीन इमारतीच्या जागेची निश्चिती करण्यात आली असून आर्किटेक्ट डिजाईन तसेच बांधकामाचा दर्जा उत्तम राखण्याबाबत व हे काम वेळेत पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. 

सदस्या थोपटे पुढे बोलताना म्हणाल्या ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच शाळेच्या इमारती सोबत गावाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य व महत्वपूर्ण आहे
Tags
To Top