Bhor News l भोर तालुक्यातील महुडे खुर्दला विजेच्या धक्क्याने म्हैसीचा मृत्यू : शेतकऱ्याचे सव्वा लाखाचे नुकसान

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के 
भोरच्या महुडे खोऱ्यातील महुडे खुर्द येथील शेतकरी विलास मारुती कुमकर खाजगी रानात जनावरे चारुन घरी घेऊन जात असताना जननी देवी मंदिरा जवळील रस्त्यावर तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागल्याने म्हशीच्या जागीच मृत्यू झाला.दरम्यान या घटनेत कुमकर यांच्या म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून शेतकऱ्याचे सव्वा लाखाचे नुकसान झाले.
     भोर तालुक्यात सर्वत्र जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने शेतकरी सध्या जनावरांना खाजगी रानात चारण्यासाठी घेऊन जात असल्याचे चित्र आहे. बहुतांशी शेतकरी घराजवळील खाजगी रानामध्ये जनावरांना चारण्यासाठी सोडत असतात.रविवार दि.५ महुडे खुर्द येथील शेतकरी विलास कुमकर जनावरे चारण्यासाठी घेऊन गेले होते. जनावरे चारून सायंकाळचे वेळी शेतकरी कुमकर जनावरांना घरी घेऊन जात असताना जननी देवी मंदिरासमोरील रस्त्यावरील तुटलेले विजेच्या तारेत म्हैस गुंतल्याने शॉक लागून जागेवरच मृत झाली.नशीब बलवत्तर म्हणून इतर ५ जनावरे व शेतकरी बचावले.संबंधित प्रशासनाने या घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळवून द्यावी अशी मागणी महुडे खोऱ्यातील शेतकरी संघटनेकडून होत आहे.तर महावितरणच्या या भोंगळ कारभाराबद्दल शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
To Top