बारामती l 'डायव्हर्जन'च्या चिखलात अडकली वाहतूक; नीरा-बारामती रस्त्यावरील अपूर्ण रेल्वे क्रॉसिंग कामामुळे नागरिक त्रस्त

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : प्रतिनिधी 
निरा–बारामती मुख्य मार्गावरील कटीन पुलाजवळ, खामगळपाटी परिसरात सुरू असलेल्या रेल्वे क्रॉसिंगच्या कामामुळे रस्ता खंडित करण्यात आला असून वाहतुकीसाठी तात्पुरता डायव्हर्जन करण्यात आला आहे. मात्र, या डायव्हर्जन मार्गाचे अद्याप डांबरीकरण झाले नसल्याने पावसाळ्यात वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सततच्या पावसामुळे डायव्हर्जन मार्गावर चिखल, खड्डे आणि घसरडा रस्ता तयार झाला असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. चारचाकी आणि अवजड वाहनांनाही या ठिकाणी वाहतूक करताना अडचणी येत आहेत.
येत्या काही दिवसांत संत सोपान काका पालखी सोहळा याच मार्गावरून जाणार असल्याने हजारो वारकरी, पालखीतील वाहने आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ राहणार आहे. त्यामुळे अपूर्ण अवस्थेतील डायव्हर्जन रस्ता पालखी सोहळ्याच्या दृष्टीनेही धोकादायक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने डायव्हर्जन मार्गाचे डांबरीकरण करून रस्ता सुरक्षित व वाहतुकीयोग्य करावा, तसेच पालखी सोहळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि वारकरी भाविकांकडून जोर धरत आहे.
To Top