Purandar Breaking l सासवड-सुपा मार्गावर अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुरंदर : प्रतिनिधी 
पुरंदर तालुक्यातील नायगाव हद्दीतील सासवड-सुपा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेश रामप्रसाद गौड (वय 35) हे स्प्लेंडर दुचाकीवरून सासवडकडून सुप्याकडे जात असताना त्यांनी भरधाव व बेदरकार वाहन चालवत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऋषिकेश सुदर्शन चौंडकर (वय 18, रा. नायगाव) यांच्या बॉक्सर दुचाकीला समोरासमोर धडक दिली.
या भीषण अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही दुचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
To Top