Purandar Breaking l मोठी बातमीः जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, चार महिला जखमी; माऊलींच्या पालखीतील दुर्दैवी घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम---
जेजुरी : प्रतिनिधी
आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनसाठी राज्यभरातून पालख्या निघाल्या आहेत. आषाढी वारीसाठी राज्यभरातून वारकरी चालत पंढरीच्या दिशेने जात असतात. या आषाढी वारीला गालबोट लावणारी एक घटना सोमवारी सकाळी घडली आहे.

जेजुरीत वारकऱ्यांच्या भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ज्या ट्रकने वारकऱ्यांना उडवले तो ट्रक वारकऱ्यांचे सामान वाहून नेणारा होता. या अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. 

प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी परिसरातील भोंगळे मळा वारकऱ्यांच्या अपघात झाला. यावेळी एका ट्रकने वारकऱ्यांच्या टेम्पोला धडक दिल्याचे समजते. यामध्ये सहा वारकरी जखमी झाले आहेत. हे वारकरी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसोबत जात असताना हा प्रकार घडला. यापैकी तीन वारकऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. ज्ञानोबा माऊलींची पालखी काल जेजुरी मुक्कामी होती. सासवडचा मुक्काम संपल्यानंतर आज पालखी जेजुरीत येणार आहे. आज सकाळी वारकऱ्यांनी जेजुरीच्या दिशेने चालायला सुरुवात केली होती. या रस्त्याला एका बाजूने वाहने सोडली जात आहेत. यापैकी एका ट्रकने मागून सहा वारकऱ्यांना धडक दिल्याची माहिती आहे. या वारकऱ्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून तिघांची प्रकृती गंभीर होती. यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित तिघांची प्रकृतीही गंभीर असल्याचे समजते.
To Top