Rajgad News | राजगड तालुक्यात विद्यार्थ्यांना मोफत रेनकोटचे वाटप

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
राजगड : मिनल कांबळे 
राजगड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून माजी.आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष स्नेहल दगडे, यांच्या प्रयत्नाने राजगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वांगणी, पाबे, मार्गासनी, खांबवडी या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत रेनकोट वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राजू रेणुसे,पंचायत समिती सदस्य गणेश जागडे,भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष शुभम बेलदरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनिल जागडे, युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पवार, चिटणीस उत्तम कांबळे, जिल्हा सचिव नंदकुमार घाटे, सरपंच अमोल पडवळ, युवा नेते विशाल वालगुडे, प्रशांत शिळीमकर, अविनाश भोसले, सुषमा जागडे, सचिन भरम, रोहिदास पिलाणे, दत्ता गायकवाड उपस्थित होते.
To Top