सुपे परगणा l सुप्यात सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात; हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील सुपे येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने मंगळवारी ( दि. ११ ) मुख्य पेठेतुन पालखी मिरवणुक काढुन पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने हरिनाम सप्ताह, पालखी व दिंडी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. 
 

         यावेळी संत सावता महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक ट्रॅक्टर ट्रॉली मधून काढण्यात आली होती. सावता महाराज मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या भव्य मंडपापासून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. वरच्या पेठेपासून ग्रामपंचायत कार्यालय ते खालच्या पेठेतून जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनच्या जुन्या इमारतीपासून बस स्थानकावर ही मिरवणूक काढण्यात आली. 

      यावेळी बसस्थानकावर अभंग गायन, भारुड व हरिपाठ आदी कार्यक्रम झाले. या पालखी प्रदक्षणा व दिंडी मिरवणुकीमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

          दरम्यान सप्ताह काळात ह.भ.प.पूजा जाधव, मनीषा लोणकर, प्रज्ञा केदार, प्रणिता दोरगे, राणी कोलते, जयराम सुपेकर आदींचे प्रवचन झाले. तर हभप अस्मिता ताम्हणे, सुरेखा चांदगुडे, हरीश फडके, संजय ढम, नवनाथ बनकर, प्रवीण चौधरी आणि माधव रसाळ आदींचे कीर्तन झाले. तर हभप नामदेव महाराज साठे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.
To Top