सुपे परगणा l डॉ. दिपक कुंभार यांची वनस्पतीशास्त्र विषयात पीएचडी

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
सुपे येथील विद्या प्रतिष्ठान संचालित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत असलेले डॉ. दिपक विठ्ठल कुंभार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून वनस्पतीशास्त्र विषयात नुकतीच पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. 
“ डॉ. कुंभार यांनी उत्परिवर्तन प्रजनन तंत्राचा वापर करून कडू कारल्याच्या प्रजातीची निर्मिती व तिचा अभ्यास ” या विषयावर संशोधन केले. 
            प्रा. डॉ. बापू अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातुन त्यांनी आपले संशोधनकार्य पूर्ण केले. सुपे येथील अध्यापनाची जबाबदारी सांभाळत संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान देत डॉ. कुंभार यांनी ही शैक्षणिक कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, सहकारी व मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले.
          कुंभार यांच्या पीएच.डी. पदवीमुळे सुपे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
   
To Top