बारामती l खा. सुप्रिया सुळे उद्या बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात : कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या सोमेश्वरनगर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता सोमेश्वर मंदिर हॉल, ता. बारामती, जि. पुणे येथे हा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष संघटना, स्थानिक प्रश्न तसेच आगामी राजकीय घडामोडींबाबत चर्चा करणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यास तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
To Top