Baramati Crime l गुन्हेगारीला लगाम! बारामतीतील चौघे दोन वर्षांसाठी हद्दपार

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
 गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चार इसमांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
           वैभव तुकाराम शेलार ( वय ३२ ), किरण मारुती गायकवाड ( वय २५ ), अमोल पोपट गायकवाड ( वय ३४, सर्व रा. मगरवाडी ) अनिकेत प्रदीप काळे ( वय २८ रा. करंजे, ता. बारामती ) आदी चार जणांना २४ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. 
       या इसमांविरुद्ध सुपे पोलीस स्टेशनंतर्गत संघटित गुन्हेगारीचे गुन्हे दाखल होते. त्यानुसार गुन्ह्यांच्या अभिलेखांचा विचार करून तसेच कायदेशीर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये १९५१ चे कलम ५५ अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
     सदर हद्दपारीच्या कालावधीत संबंधितांना बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व हवेली आदी तालुके, पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची हद्द तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका या क्षेत्रांबाहेर हद्दपार करण्यात आले आहे.
      तसेच हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून संबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.
     .......................
To Top