Baramati Crime l शाळेत ये-जा करणाऱ्या मुलीला धमकावून अत्याचार; गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघडकीस! आरोपी पोलिसांच्या अटकेत


सोमेश्वर रिपोर्टर टीम----

वडगाव निंबाळकर ; प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत हा प्रकार सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी निरगुडवाडी येथील सतीश मोहिते याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिचा पाठलाग केला. ती शाळेत ये-जा करीत असताना रस्त्यात अडवून तिच्याकडे मैत्रीची मागणी केली. मात्र, मुलीने नकार दिल्यानंतर तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला स्वतःच्या राहत्या घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या अत्याचारातून मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

To Top