सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा बाळासाहेब मेरगळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यापुर्वीचे उपसरपंच मोहन भोंडवे यांनी राजीनामा दिल्याने या रिक्तपदी शारदा मेरगळ यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. येथील सरपंच सारिका भोंडवे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाच्या निवडीची बैठक घेण्यात आली.
यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन ग्रामपंचायत अधिकारी अनिशा खोमणे यांनी काम पाहिले. याप्रसंगी सोपान भोंडवे, राहुल भोंडवे, रवींद्र भोंडवे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.





