बारामती l बोगस आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करत नोकरीचे अमिष; तरुणास ७.८५ लाखांचा गंडा : तोतयास अटक


सोमेश्वर रिपोर्टर टीम----

बारामती ; प्रतिनिधी

बारामती शहर पोलीस ठाण्याचे हददीतील डार्लेवाडी ता. बारामती येथील तरूण आरीफ शहाजहान शेख व त्याचा भाऊ यांना तीसीन इब्राहिम मनियार मु. पाटकर वस्ती बारामती याने मी आय पी एस अधिकारी आहे असे सांगून मी तुम्हाला माझे ओळखीनी अन्न व प्रशासन विभागात सरकारी नोकरीला लावती असे म्हणुन आरीफ शहाजहान शेख याचे कडून सुमारे ७ लाख ८५ हजार रूपये घेवून खोटे बनावट नोकरीचे प्रमाण पत्र, नियुक्ती पत्र तयार करून देवून त्यांची सन २०२२ ते सन २०२६ चे दरम्यान फसवणूक केली आहे. त्याबाबत आरीफ शहाजहान शेख यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला तकार दाखल केली आहे. याबाबत बारामती शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.  त्यानंतर सदर गुन्हयाचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आला. नंतर सदर गुन्ह्यातील आरोपी हा पोलीसांना गुंगार देत होता. त्याची माहिती मिळवून तोसीन इब्राहिम मनियार रा. सय्यद पाटकर वस्ती, बारामती बोगस आयपीएस अधिकारी म्हणवून घेणा-यास दिनांक २१.११.२०२६ रोजी अटक केली. 

सदर कार्यवाही संदिपसिंह गिल्ल साो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण,  गणेश बिरादार साो अपर पोलीस अधिक्षक बारामती, चैतन्य कदम सही उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मनिषा ओमासे पोलीस उपअधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महिला पोलीस अमंलदार भागश्री देवकाते, पोलीस शिपाई विजय ओमासे, पोलीस शिपाई प्रविण शिंगाडे, यांनी सदरची कामगीरी केलेली आहे.

To Top