त्या रिक्षाचालकाच्या संपर्कातील ८३ जणांना केले क्वॉरेंटाईन.

Pune Reporter
त्या रिक्षाचालकाच्या संपर्कातील ८३ जणांना केले क्वॉरेंटाईन

रिक्षाचालकाची पत्नी, सासू, दोन मुले व अन्य तीन नातेवाईकांना नायडू रुग्णालयात केले दाखल.

सोमेश्वरनगर  दि  ३०

बारामती शहरातील श्रीराम नगर येथील रिक्षाचालकाला करोना झाल्याचे रविवारी (दि. 29) स्पष्ट झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर प्रशासनानेही उपायोजनांसाठी कंबर कसली आहे. या रिक्षाचालकाच्या संपर्कात आलेल्या 83 जणांना क्‍वारंटाइन केले आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी, सासू, दोन मुले तसेच एका सोसायटीतील त्याचे तीन नातेवाईक यांच्यासह सात जणांना नायडू हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्ट सोमवारी संध्याकाळी येणार आहेत.
To Top