प्रसिद्ध उद्योगपती आर.एन. शिंदे यांना खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी .

Pune Reporter
प्रसिद्ध उद्योगपती आर.एन. शिंदे यांना खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी .


सोमेश्वरनगर दि:३०
तुषार धुमाळ -प्रतिनिधी 

बारामती तालुक्यातील प्रसिध्द उद्योगपती व तिरुपती बालाजी मशरुम कंपनीचे मालक आर.एन.शिंदे यांना खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने मोठी खळबळजणक घटना घडली आहे.आर.एन.शिंदे हे प्रसिध्द उद्योगपती आहेत. सोमेश्वरनगर येथील तिरुपती बालाजी मशरुम कंपनी याचे ते मालक आहेत. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनला असिफ मनियार रा. नाशिक याच्या विरुध्द  गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी असिफ मनियार हा १जाने २०२० पासुन २१मार्च पर्यंत आर एन शिंदे यांच्या मोबाइलवर वेळोवेळी फोन करून मेसेज करून पैशाची मागणी करत होता. दि १९/३/२०२० रोजी शिंदे यांच्या मोबाइलवर इंग्रजीमध्ये 2 K अशा टेक्स मेसेज पाठवून नंतर २१/३/२०२० रोजी फोन करून फोनवरून तुम्ही दोन दिवसांपूर्वी मेसेज केला ते तेवढे  तयार ठेवा असे शिंदे यांना बोलून 2 K शिंदे यांनी म्हणजे काय असे विचारले त्यावर आरोपीने शिंदे यांना दोन कोटी रुपयांचे सांगितले व  खंडणीची मागणी करत ते पैसे तुम्ही दिले नाही तर तुम्हाला संपविन अशी धमकी दिली.
सदर गुन्ह्याचा तपास पो.स.ई कवितके ,पो.हवा नलवडे करत आहेत.
To Top