सोमेश्वरनगर परिसरात एकाच पावसात वीजेचे तीन तेरा
सोमेश्वरनगर दि:२०
रविवारी सायंकाळी सहा झालेल्या पावसाने सोमेश्वरनगर परिसरातील वीज सेवा २४ तास झाले तरी अद्याप विस्कळीत आहे .त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सर्व दैनंदीन कामावर परिणाम झाला आहे .
कोरोना च्या पार्श्वभूमीवर घरी असणारे लोकाना आधीच वर्तमानपत्रे बंद असल्याने बातम्या समजु शकल्या नाहीत . ऑनलाईन वृत्तपत्र वाचण्यास मोबाईल देखील चार्ज नाही . त्यातच तीव्र उकाडा आहे वीज नसल्यामुळे फॅन व इतर विद्युत उपकरणे बंद आहेत २४ तास झाले तरी अद्याप निंबुत ,करंजेपुल, सोमेश्वरनगर, वाणेवाडी, मळशी परिसरातील कुठलीच वीज सेवा सुरळीत करण्यात वीज कर्मचाऱ्यांना यश आले नाही. संपर्क केला असता काम चालु आहे एवढेच उत्तर मिळत आहे. काल झालेल्या वादळाचा सर्वात जास्त फटका मळशी या ठिकाणी बसला आहे. या ठिकाणी जवळपास १० पेक्षा अधिक विद्युत खांब कोसळले आहेत मात्र अद्यापपर्यंत महावितरण ने मळशी मध्ये कोणतेही काम हातात घेतले नाही.
COMMENTS