सोमेश्वरनगर प्रतिनिधी
आज दुपारी सोमेश्वर महावितरण विभागातील कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवत असलेले मयूर काकडे याला मेन लाईन विजेचा शॉक लागून तो २५ टक्के भाजला आहे, उपचारासाठी त्याला लोणंद येथे गोरड हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
सोमेश्वर महावितरण येथे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेला मयूर सुरेश काकडे हा दुपारी एक वाजता वाघळवाडी अंतर्गत येणाऱ्या निरा डाव्या कालव्या लगत घाडगे मोरी या ठिकाणी कामानिमित्त ११ केव्ही (मेन लाईन ) असलेल्या विदुयत खांबावर चढला होता. खांबावर चढण्यापूर्वी त्याने संबंधित कर्मचाऱ्याशी फोन वरून संपर्क साधून वीज पुरवठा बंद असल्याची खात्री करून खंबा वर चढला. ११ केव्ही खांबावर चढताच वीज पुरवठा चालू असल्याने एक मोठा आवाज झाला आणि मयूर काकडे हा बाजूला फेकला गेला. आवाज झाल्याचे ऐकून जवलच असलेले शरद जगताप यांनी त्याला डॉ गणेश जगताप येथे उपचारासाठी दाखल केले. त्याला जास्त भाजल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला लोणंद या ठिकाणी दाखल केले आहे.
COMMENTS