सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वरनगर परिसरातील व्यावसायिकाना उद्या दि ८ मे पासून शासनाच्या नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्स ठेवत दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
आज करंजेपुल पोलीस ठाण्यात पोलीस, सरपंच, पत्रकार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे, बारामती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त adv. गणेश आळंदीकर, करंजेपुल चे सरपंच वैभव गायकवाड, वाणेवाडी चे उपसरपंच संजय जगताप, सराफ असोसिएशनचे चे उपाध्यक्ष किरण आळंदीकर, तुषार सकुंडे, हरीश जगताप, विराज जगताप पत्रकार तुषार धुमाळ आणि पोलीस हवालदार महेंद्र फणसे उपस्थित होते. यावेळी निंबुत, निंबुत छपरी, वाघळवाडी, करंजेपुल, सोमेश्वरनगर, वाणेवाडी आणि मुरूम या ठिकानावरील दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.
काय राहणार बंद--
हॉटेल्स- रेस्टॉरंट, सलून, ब्युटीपार्लर, मॉल आणि सिनेमा थिएटर हे बंद राहणार असून इतर दुकाने सुरू राहणार आहेत.
पाच पेक्षा जास्त दुकाने असलेल्या कॉम्प्लेस साठी नियमावली
ज्या ठिकाणी पाच पेक्षा जास्त दुकाने आहेत अशा ठिकाणी एका आड एक दुकान उघडायला परवानगी देण्यात आली आहे. करंजेपुल आणि वाणेवाडी येथील हरणाई चौक येथील कॉम्प्लेस ला हा नियम लागू होत आहे.
दुकानदाराने घ्यावयाची काळजी
दुकानात कंपल्सरी सॅनिटायझर ठेवणे, विक्रेता आणि ग्राहक दोघांना मास्क आवश्यक, सोशल डिस्टन्स चे पालन करत दोन ग्राहकात ६ फुटाचे अंतर ठेऊन गर्दी होणार नाही याची काळजी घेणे.
सोमनाथ लांडे- सपोनि वडगाव निंबाळकर
कॉम्प्लेस मधील दुकानदाराने एका आड एक दुकान उघडणे बंधनकारक आहे. कायद्याचे पालन करून सोशल डिस्टन्स चे पालन करणे गरजेचे आहे.
#जाहिरात
COMMENTS