लोणंद प्रतिनिधी
लोणंद जवळ असलेल्या तरडगाव, तांबवे येथे यापूर्वीच कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडले असून लोणंद मात्र अजूनही कोरोनाला थोपवण्यात यशस्वी झाले होते. मात्र लोणंद येथील एका लहान मुलीचे कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने लोणंदने देखील आपले कोरोना खाते खोलले आहे.
लोणंद येथील शहरालगत असलेल्या नागरी वसाहतीतील एका कुटुंबाचे तांबवे येथील बाधित रूग्णाशी निकटचे संबंध आलेले होते. त्यापैकी एका लहान मुलीचे कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने लोणंदमधे खळबळ उडाली आहे. रूग्ण आढळल्याने कंटेन्मेंट झोनमधे लोणंद येत असल्यामुळे तातडीने लोणंदच्या सीमा सील करण्यात येऊन खबरदारीचा उपाय म्हणून लोणंद मधील सर्व प्रकारची दुकाने तात्काळ बंद करण्यात आली आहेत. तसेच लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
याच बरोबर लोणंदमध्ये भाजी व फळांची दुकाने बंद करावीत व कोणीही घराबाहेर पडू नये असे अवाहन नगराध्यक्ष सचिन शेळके व मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी केले आहे.
COMMENTS