नीरेत विदेशी मद्यच्या दुकाना समोर मोठ्या रांगा
नीरा :प्रतिनिधी
#जाहिरात
पुरंदर तालुक्याच्या सिमेवरील नीरा शहरात एक विदेशी मद्य विक्रीचे व दोन देशी विक्रेत्यांची दुकाने आहेत. विदेशी मद्य विक्रेत्यांच्या दुकाना समोर मोठ्या रांगा पहायला मिळाल्या तर देशी मद्य विक्रेत्यांची दुकाने ओस पडली होती. तीनही दुकांना मध्ये थर्मल टेस्टींग, सेनिटायजर फवारणी, सोशल डिस्टंसींग काटेकोर पाळले जात होते. सकाळी दहा वाजता दुकाने सुरू झाली. मात्र ही बातमी वा-यासारखी पसरली आणि पुरंदर तालुक्यातील खेडेगावातील, बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावा पासुन, सातारा जिल्ह्यातील फलटण व खंडाळा तालुक्यातील लोकांनी तोबा गर्दी केली. पोलीस बंदोबस्त असतानाही लोक गर्दी करत होते. त्यामुळे सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडाला आणि नीरा पोलीसांनी व मद्य विक्रेत्याने दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. तरीही लोक घरी जात नसल्याने पोलीसांनी धाक दाखवून लोकांना पांगवले.
आज एक प्रकर्षाने जाणवले की देशी मद्य विक्रेत्यांच्या दुकाना समोर कुठल्याही प्रकारची रांग लागली नव्हती. तुरळक गिर्हाईक येत असल्याने ते नाराज होते. तर विदेशी मद्य विक्रेत्यांच्या दुकानांमधून लोक डझन आर्धा डझन बाटल्या खरेदी करत होते. परत दुकान नाही उघडले तरी आता चिंता नाही असे म्हणत आनंदात घरी जात होते. ज्यांना मद्य मिळाले तर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता तर ज्यांना मिळले नाही ते प्रचंड नैराशैत घरी गेले. सकाळी दहाला उघडलेले दुकान दुपारी साडेबारा वाजेपर्यंत चालू होते पण गर्दी वाढल्याने साडेबाराच्या सुमारास दुकाने बंद झाल्याने मद्यपींचा हिरमोड झाला. मद्यपींनी नाराजी व्यक्त केली. ही गर्दी बघण्यासाठी लोक मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा जमा झाले होते.