सुर्यग्रहणा काळात नीरा नदीत उपासना.
पुरंदर :प्रतिनिधी
आज सुर्य ग्रहण होत आहे. ग्रहणाच्या पार्श्र्वभूमीवर हिंदू धर्मियांच्यात वेगवेगळ्या साधना आहेत. ग्रहण काळात ध्यान, साधना, आराधना, नामस्मरण, करण्यात येते. नीरा नदीच्या पवित्र तिर्थामध्ये आज काही साधक आपली साधना करत आहेत. नदीच्या पाण्यामध्ये बसून किंवा उभे राहून मंत्र्यांचा जप किंवा ग्रंथांचे वाचन करत आहेत.
ग्रहणाच्या काळात वेगवेगळ्या विधी केलेल्या जातात. आज होत असलेले सुर्य सकाळी १० ते १.३० वाजेपर्यंत सुरू आहे. या काळात नीरा दत्त मंदिरा समोर नदीच्या पाण्यात कही साधक उघडल्या अंगाने बसले अथवा उभे होते. ग्रहणाच्या काळ हा साधकांसाठी एक अन्न्यसाधारन काळ असतो. या साधने वेळीही या लोकांनी कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन केले होते. प्रत्यक दोन व्यक्तींमध्ये अंतर होते. कोणी गुडघाभर तर कोणी कंबरे इतके पाण्यत बसले होते. हातामध्ये जपाची माळ घेतली होती तर काही साधक धर्मग्रंथांचे पाण्याच्या काठावर बसून वाचन करत होते.
नवनाथ कुंभार ,वास्तुविशारद नीरा
COMMENTS