गुऱ्होळीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या आईचा मृत्यू.
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील गुऱ्होळी येथील एक मुंबईहुन आलेल्या व्यक्तीच कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील ९ लोकांना सासवडच्या कोरोना सेंटरमध्ये हलविण्यात आले होते. त्यामधील त्या व्यक्तीच्या आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.त्या महिलेचा मृत्यु झाल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.
गुऱ्होळी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे वय ८२ वर्षे होते. पुणे येथे शासकीय दवाखान्यात त्या उपचार घेत होत्या. तालुक्यात आतापर्यंत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ११ इतकी संख्या झालेली असून त्यापैकी दोन मयत आहेत. आज दवाखान्यात एकूण ३ रुग्ण आहेत तर ६ जण उपचार घेऊन परत आले आहेत.
पुरंदरच्या प्रशासनाने कोरोना रोखण्या मध्ये मागील काळामध्ये मोठे प्रयत्न केले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांनाही कोरोना संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे पुरंदरच्या प्रशासनाने खबरदारी घेत कोरोनाचा प्रसार रोखण्या मध्ये यापूर्वी मोठी भूमिका घेतली होती. मांढर येथील मयत व्यक्तीच्या संपर्कातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला होता. तर आता गुऱ्होळी येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील त्यांची आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या नंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. तरीही पुरंदरकरांनी काळजी करण्याचे कारण नाही, फक्त काळजी मात्र घेतली पाहिजे. यापुढे अनलॉक वन सुरू झाला आहे. त्यामुळे जनजीवन पूर्ववत होण्यास सुरुवात होत आहे. तरीही लोकांनी सतर्कता बाळगत तोंडाला मास्कचा वापर, गर्दीमध्ये जाण्याचे टाळणे, हात स्वच्छ धुणे, दोन व्यक्तींमधील अंतर सहा फूट असणे गरजेचे आहे; हे सर्व तंतोतंत पाळले तर त्याचा संसर्ग होणार नाही.
COMMENTS