पुरंदर तालुक्यातील गुऱ्होळीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह.
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील गुऱ्होळी येथील मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीचा कोरणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील नऊ व्यक्तींना सासवड येथील कोरोना सेंटरमध्ये ठेवले होते.
आज दुपारी त्या व्यक्तीच्या आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता आत्ताच थोड्यावेळापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार या कुटुंबातील आणखी तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे पुरंदर करांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.
गुऱ्होळी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या बायकोचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. पुणे येथे शासकीय दवाखान्यात उपचार घेत आहेत. गुऱ्होळी येथील एकाच घरातील एकूण तीन व्यक्ती कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून एक महिला मयत आहे.
तालुक्यात आतापर्यंत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण १२ इतकी संख्या झालेली असून त्यापैकी दोन मयत आहेत. आज दवाखान्यात एकूण ४ रुग्ण आहेत, ६ उपचार घेऊन परत आले आहेत.
COMMENTS