गुळुंचेच्या उपसरपंच पदी चंदा निगडे बिनविरोध.
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील गुळुंचे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंदा दशरथ निगडे यांची निवड झाली आहे. माजी सरपंच संतोष निगडे यांनी आपला कार्यकाळाचा ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर चंदा निगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गुळूंचे तालुका पुरंदर येथील ग्रामपंचायतीची निवडणूक मागील अडीच वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी थेट सरपंच निवड संभाजी कुंभार यांची झाली होती. त्यावेळी पहिल्या सत्रामध्ये शितल निलेश निगडे त्यानंतर संतोष विश्वास निगडे यांचा उपसरपंच कार्यकाळ झाला होता. पूर्वी ठरल्याप्रमाणे चंदा निगडे यांची निवड आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात आली. यावेळी दहा पैकीआठ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
सरपंच संभाजी कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडली या निवडणुकी दरम्यान चंदा निगडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुकीच्या वेळी अंती निगडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी सरपंच यांना ग्रामसेवक जयंत सुळ यांनी सहकार्य केले यावेळी माजी उपसरपंच शितल निलेश निगडे संतोष विश्वास निगडे, प्रवीण निगडे, संतोष निगडे, विकास भंडलकर, संगीता नेवसे, उषा पाटोळे हे उपस्थित होते.
COMMENTS