पुरंदरच्या सासवड मध्ये अजून एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह.
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे कोरोना रुग्णांच्या संख्या मध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा संध्याकाळी उशिरा पुन्हा एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
सासवड शहरातील एका व्यक्तीचा आज कोरोना अहवाल positive आलेला आहे. सदर व्यक्ती पुणे येथील दवाखान्यात दाखल आहे अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
त्यामुळे आता सासवड मध्ये कोरोनाचा धोका वाढताना दिसुन येत आहे. त्यामुळे सासवडकरांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. पुढील काळात सासवड वासियांनीनी संसर्ग होऊ नये यासाठी गांभीर्याने वागावे तसेच कोरोना संशयितांच्या संपर्कात येऊ नये याची काळजी घ्यावी. कुठल्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. परिस्थीती नियंत्रणात आहे.
COMMENTS