दिलासादायक... मोढावे येथील त्या दोन मुलींच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटीव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुर्टी मोढावे या ठिकाणी मुंबई भांडुप येथून आलेल्या दोन मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या दोन मुलींच्या संपर्कातील सहा लोकांची चाचणी घेण्यात आली होती. या सर्व सहा ही जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.
या मुलींच्या आई वडिलांनी दि. १४ रोजी या दोन मुलींना मोढवे या ठिकानी आज्जी व आजोबांकडे सोडून गेले होते, मोढवेत या मुलींना सोडून गेल्यावर त्यांच्या आईचा अहवाल मुंबई दि १९ ला पॉझिटिव्ह आला, त्या मुलींना पण सर्दीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांची दि २१ रोजी तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर त्यांच्या संपर्कातील सहा जणांचे अहवाल निगेटीव्ह आला असल्याने दिलासा मिळाला आहे.
COMMENTS