पुरंदरच्या सासवड येथील तिघे कोरोना पॉझिटिव्ह
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मागील आठवड्यात दोन रुग्ण तर काल एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर आज सकाळी पुन्हा तीन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले आहे.
सासवड येथील कोरोना लक्षण असलेल्या तीन व्यक्तींचे कोरोना अहवाल positive आलेले आहेत. पुरंदरतालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ३० वर पोहोचली आहे. तर सासवडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची लक्षणीय संख्या असल्याने सासवडकरांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.
COMMENTS