पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील पहिल्या महिलेच्या संपर्कातील दुसरी महिला पॉझिटिव्ह
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंगोरी येथील एक महिला मागील आठवड्यात पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्या संपर्कातील एक ३५ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
पिंगोरी येथील १० थेट संपर्कातील (हाय रिस्क) एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. पिंगोरी येथे १३ जून ला एक महिला ठाणे घोडबंदर येथून आपल्या मूळ गावी पिंगोरी येथे आल्रा होत्या. २३ रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने. त्यांच्या संपर्कातील १० व्यक्तींना जेजुरी येथील कोरांटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते. त्या पैऊ एका ३४ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता ग्रामिन भागात कोरोना पसरु लागल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
COMMENTS