सासवडच्या रुग्णाच्या संपर्कातील ९पैकी ४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह.
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदरच्या सासवडमधील एका रुग्णाचा काल कोरोना मुळे रात्री उशिरा मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील नऊ व्यक्तींचा कोरोना चाचणी करण्यात आली होती. नऊ त्यापैकी चार व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.
सासवड येथील साळे आळीतील रुग्णाच्या संपर्कातील ९ व्यक्तींपैकी ४ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. सासवड येथील साळे आळीतील ७० वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा काल रात्री मृत्यू झाला होता. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना सासवड येथील कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे कोरोना स्वॅप घेऊन पुणे येथे तपासणी करण्यासाठी सकाळी पाठवले होते. त्यातील चार व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता धोका वाढताना दिसुन येत आहे. त्यामुळे सासवडकरांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. पुढील काळात सासवड वासियांनीनी संसर्ग होऊ नये यासाठी गांभीर्याने वागावे तसेच कोरोना संशयितांच्या संपर्कात येऊ नये याची काळजी घ्यावी.
COMMENTS