जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत देण्यात आलेल्या गोळयांचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वाटप
बारामती : प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत देण्यात आलेल्या अर्सेनिक अल्बम 30, व्हिटॅमीन डी-3, व्हिटॅमीन सी व झिंक गोळयांचे वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती, प्रमोद काकडे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. भगवान पवार, पंचायत समिती सभापती, नीता बारवकर, जिल्हा परिषद सदस्य, प्रदिप धापटे, उपसभापती पंचायत समिती, भरत नाना खैरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक, मिलिंद मोहिते, तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी, राहूल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय बारमती, डॉ. सदानंद काळे आदी उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेमार्फत कोरोना प्रतिबंधासाठी व रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होण्याकरीता पुरविण्यात येणा-या अल्बम 30, व्हिटॅमीन डी-3, व्हिटॅमीन सी व झिंक या गोळयांचे रक्तदाब व मधुमेह असण-या व्यक्तींनी तसेच नागरिकांनी नियमित सेवन करावे, वयस्कर व्यक्तींनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आहारामध्ये पालेभाज्या, कडधान्य, फळे, यांचा नियमित वापर करावा अशा, सूचना मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी दिल्या.
COMMENTS