मुरूम ता ठिकाणी घरफोडी: ८० हजाराचा ऐवज लंपास
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
मुरूम ता बारामती येथे बुणगेवस्ती या ठिकाणी गजानन गुरप्पा गायकवाड यांचे घर रात्री १ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फोडले यामध्ये सुमारे ८० हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत गजानन गायकवाड यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मुरूम ता बारामती येथील बुणगेवस्ती वर माझे घर असून रात्री एक च्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूकडील किचन च्या दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश केला, यावेळी घरातील मी, पत्नी, मुलगा आणि भाची झोपेत असताना चोरट्याने कपाटातील रोख रक्कम ४० हजार, पॅन्टच्या खिशातील ५ हजार, १८ हजार आणि १३ हजार असे दोन अँड्रॉइड मोबाईल आणि त्यांचा मुलगा मार्केटिंग चे काम पाहतो त्या कंपनीची ५ हजार रुपये किंमतीची औषधे असा ८० हजाराचा ऐवज लंपास केला.
COMMENTS