चिंता वाढली पुरंदरमधे तीन कोरोना पॉझिटिव्ह वाढले.
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील काल एका व्यक्तीचा सकाळी कोरणा रिपोर्ट पॉझिटिव आला होता त्याच्या संपर्कातील एका व्यक्तीचा रिपोर्ट आज पॉझिटिव आला आहे तसेच सासवड येथील एका वृद्ध महिलेचा व माहूर येथील मुंबईहून आलेल्या एका महिलेचा कोरणा रिपोर्ट पॉझिटिव आल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
सासवड येथील रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या बायकोचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सासवड येथील वयस्कर महिला व माहूर येथील मुंबई येथून आलेली महिला यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. आज मंगळवारी एकूण तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत.
कोरोनाची ट्वेंटी-ट्वेंटी मॅच पुरंदरच्या प्रशासनाने जिंकली होती. मात्र टेस्ट मॅच मध्ये लोकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्याने व प्रशासनाच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने, आता पुरंदरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. पुरंदरची प्रशासन कोरोना रोखण्यात आटोकाट प्रयत्न करत आहे. पण मुंबई, पुणे व इतर शहरातून आलेले लोक कोरंटाईनचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे कोरोना खेडेगावांमध्ये पसरत आहे. तरी कृपया लोकांनी कोरोना गेल्याची समजूत करून घेतली आहे. हा धोक्याचा इशारा आहे. कृपया सर्वांनी कोरोनाचे नियम तंतोतंत पाळावे तर आणि तरच आपले गाव कोरोना मुक्त राहू शकते असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. काळजी घ्या काळजी करू नका फक्त घरातच बसा.
COMMENTS