कोऱ्हाळे बुद्रुकच्या सरपंचपदी जयश्री संजय धापटे यांची बिनविरोध निवड
संतोष भोसले
प्रतिनिधी, वडगाव निंबाळकर,
कोऱ्हाळे बुद्रुक ता. बारामती येथिल सरपंच पदी जयश्री संजय धापटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पंचवार्षीक मधे गावातील विविध घटकातील प्रतिनिधींना काम करण्याची संधी मिळाली. अश्विनी गोविंद गुळूमकर यांनी ठरलेल्या वेळात आपल्या सरपंच पदाचा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच पार पडली यावेळी धापटे यांची बिनविरोध निवड झाल्याचे मंडल अधिकारी रवी पारधी यांनी घोषित केले. यावेळी उपसरपंच भाग्यश्री गुलाब कचरे, सदस्य दत्तात्रय माळशिकारे, शामराव खोमणे, सुदीप माळशिकारे, शैला भगत, भाग्यवान चव्हाण, उमाजी खोमणे, शारदा कदम, मनीषा भगत, ग्राम विकास अधिकारी राजेंद्र शिंदे उपस्थित होते. सदस्य मंडळाचे मार्गदर्शक सुनील भगत, रामचंद्र भगत, दत्तात्रय भगत, विठ्ठल भगत यांनी कामकाजाचा आढावा घेउन पुढिल उद्दीष्ट निश्चित केले.
-------------------
COMMENTS