पुरंदरच्या सासवड मध्ये आज पुन्हा नवे चार कोरोना पॉझिटिव्ह
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड मधील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. मागील आठवड्यात रुग्णांची संख्या१४ होती तर आज सकाळी तीन रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दुपारी पुन्हा एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने दुपारी चार पर्यंत आजच्या दिवसात चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले.
सासवड येथील व्यंकटेश नंदनवन येथील रुग्णाच्या संपर्कातील एक व्यक्ती, जयप्रकाश चौक ते अमर चौक येथील रुग्णाच्या संपर्कातील एक व्यक्ती,
लांडगे अळी येथील एक व्यक्ती असे सकाळी तीन लोक कोरोना positive आले आहेत. तर सासवड येथील साळी आळीतील एका व्यक्तीच्या कोरोना अहवाल positive आलेला आहे.
आज दिवसभरात आतापर्यंत सासवड येथे चार कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दोन पूर्वीच्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील असून दोन नवीन रुग्ण आहेत. आज बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत एकुण रुग्णांची संख्या १८ झाली आहे.
त्यामुळे आता सासवडमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कालपासून सासवड नगरपरिषदेने पुढील चार दिवसासाठी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. त्यामुळे पुढील काळात रुग्णांची संख्या वाढण्यास अटकाव होईल अशी शक्यता आहे. सासवड नगरपालिकेने कालपासून पुकारलेल्या जनता लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे, अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडूच नये, पॉझिटिव्ह असलेल्या प्रभागांमध्ये किंवा कोरोना रुग्णांच्या शेजारील लोकांनी खबरदारी घेत लोकांमध्ये मिसळू नये, नोकरी, कामधंदा निमित्त कोणीही बाहेर जाऊ नये. कुठल्याही बाहेरील वस्तू खरेदी करून घरात आणू नये, पुढील चार दिवस दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व आपले सासवड शहर कोरोनमुक्त करावे असे आव्हान सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी केले आहे.
COMMENTS