न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थी डिजिटल अभ्यासात मग्न.
लोणीभापकर : प्रतिनिधी संजय कुंभार
न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर येथील विद्यार्थ्यांसाठी विद्यालयाच्या शिक्षकांनी व्हाट्सअप चा उपयोग करून पाचवी ते नववी या वर्गाचे टेस्टमोझद्वारे आणि झुम ॲप चा उपयोग करून पीपीटी द्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तासिका रोजच्या रोज घेतल्या जात आहेत विद्यार्थी या दोन तीन तासांच्या डिजिटल अभ्यासात मग्न होत आहेत. आणि शिक्षकांनाही सुट्टीचा सदुपयोग केल्याचे समाधान लाभत आहे.
कोरोनाच्या आक्रमणामुळे 18 मार्चपासून आज अखेर मुले घरात असून पुस्तके आणि खेळांपासून दुरावली आहेत. बारामती तालुक्यातील जिराईत भागात लोणी भापकर येथे असणारे न्यू इंग्लिश स्कूलची कामगिरी कौतुकास्पद आहे. आणि यामध्ये विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका मुलांना या डिजिटल अभ्यासाद्वारे शिकवत आहेत. ग्रामीण भागातून विविध वाड्या-वस्त्यातून या शाळेत येणारी मुले आहेत.या जिरायत भागातील पालक व विद्यार्थी या डिजिटल अभ्यास चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत.
जिरायत भागात जवळपास 70 टक्के विद्यार्थी स्वेच्छेने मोबाईलद्वारे जोडले गेले आहेत दहावीच्या 97 पैकी 86 विद्यार्थ्यांचे पालक मोबाईल धारक आहेत अन्य मुलांचा अभ्यास असे आम्ही पूर्ण करून घेणार आहोत, सध्या मुले अभ्यासापासून दूर राहू नयेत संपर्कात रहावेत हा उद्देश असून पालक ,संस्थाध्यक्ष बाबासाहेब भापकर,सचिव बाळकृष्ण भापकर,सहसचिव विजयसिंह भापकर व शिक्षकांच्या मदतीने डिजिटल शिक्षण यशस्वी झाले आहे.
संदीप जगताप (मुख्याध्यापक)
COMMENTS