सोमेश्वरच्या प्रगतीत कामगारांचा सिंहाचा वाटा- पुरुषोत्तम जगताप

Admin
सोमेश्वरच्या प्रगतीत कामगारांचा सिंहाचा वाटा- पुरुषोत्तम जगताप

सोमेश्वरनगर   प्रतिनिधी

सोमेश्वर कारखाना चालू गळीत हंगामात ऊस गाळप, साखर उत्पादन आणि साखर उताऱ्यात जिल्ह्यात  आघाडीवर राहिला आहे, कारखान्याच्या इतर घटकांबरोबरच साखर कामगारांचा कारखान्याच्या प्रगतीत सिंहाचा वाटा असल्याचे मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
              सोमेश्वरनगर ता बारामती येथे सोमेश्वर कारखान्यातील सेवानिवृत्त कामगारांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष शैलेश रासकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक सुनील भगत, नामदेव शिंगटे, किशोर भोसले, दादासाहेब मोरे, विशाल गायकवाड, ऋतुजा धुमाळ, बाळासाहेब काकडे, सिद्धार्थ गीते, मोहन जगताप, महेश राणे, गणेश चांदगुडे, खलाटे, आदी मान्यवर उपस्थित होते. 
          यावेळी विश्वास निगडे, ज्ञानेश्वर खैरे, दिलीप परकाळे, जयराम लकडे, संजय पाटील, हनुमंत लकडे, सुरेश कदम, अंकुश जगताप, दत्तात्रय गायकवाड आणि बाळासो कदम या सेवानिवृत्त कामगारांना शाल, फेटा आणि सन्मानचिन्ह देऊन संचालक मंडळाच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने संचालक मंडळाच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 
            कार्यक्रमात सुनील भगत आणि महेश राणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी दत्ता माळशिकारे यांनी केले तर आभार कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांनी मानले.
To Top