पुरंदरच्या सासवड मध्ये एक ७० वर्षीय वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषदेच्या हद्दित कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज शनिवार दि.२७ रोजी सकाळी एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता सासवड शहरात २१ कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे.
सासवड येथील चव्हाण कॉर्नर ते लांडगे अळी मधील एक व्यक्ती कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे. ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणा जवळ सासवड मधील एका नगरसेवकाच्या कुटुंबातील काही व्यक्ती पॉझिटिव्ह आले होते. ही व्यक्ती त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता कोरोना संसर्गाची सासवडमध्ये सुरुवात झाल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह झालेला रुग्ण यांच्या कुटुंबातही ही मोठ्या संख्येने व्यक्ती एकत्र रहात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्या सर्वांची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे आता सासवड मध्ये घबराट पसरली आहे.
सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकार्यांनी सासवडमध्ये गेली चार दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. तरीही लोकांनी या जनता कर्फ्यूचे तंतोतंत पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, पडल्यास तोंडाला मास्क, सॅनिटायझर सोबत ठेवावे. वृद्ध व लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नये. तसेच तालुक्यातील इतर गावातील लोकांनी सासवडला येण्याची शक्यतो टाळावे अतितातडीचे काम असल्यास तरच सासवड शहरात यावे, असेही आव्हान करण्यात येत आहे. तालुक्यातील इतर गावातील लोकांनी ही सावधानता बाळगत सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझर व शासनाने सांगितलेल्या उपाय योजना तंतोतंत पालन पालन करावे.
COMMENTS