तुषार धुमाळ : विशेष प्रतिनिधी
#ते ट्रेंड चालू हाय म्हण फुटूचा . . . अशा आशयाचा मजकूर लिहत सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्म वरत धुमाकूळ घालणारे एका विशेष अॅप मध्ये फोटो तयार करत आपापल्या प्रोफाइल वरुन शेअर केले जाताहेत.
कोरोणच्या पार्श्वभूमी वरती अख्या जगामध्ये लाॅकडाउन जाहीर करण्यात आला त्यामुळे सर्व घरात बंदिस्त झाली या मोकळ्या कालावधीमध्ये अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडिया वरती वेगवेगळे ट्रेंड अवलंबले यामध्ये लहानपणीचे जुने फोटो ,आपण मला कसं ओळखता ? माझं पाहिलं प्रेम..अशा नाना प्रकारच्या युक्त्या सोशल मीडियावरती करत आपली वेळ घालवला .
या माध्यमातून अनेक जणांची सोशल मीडियावर ती घट्ट मैत्री जमली त्यातून एका नव्या विचार धरणाची पिढी निर्माण होतानाही दिसली त्यामुळे सोशल मीडियाचा उपयोग मोकळ्या वेळामध्ये चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो याचा एक उत्तम उदाहरण हा लॉक डाउन ठरला .
देशात या अॅप ने मागील काही दिवसांत सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मची युजर्सनी आपले फोटो अपलोड करत त्या डिझाइनमध्ये तयार करून घेताहेत व मनस्वी आनंद लुटत आहेत.
या अॅप मधून विविध प्रकारचे फोटो तयार करून व्हाट्सअप, फेसबुक, tiktok, ट्वीटर, इंस्टा अशा सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉम् वर हे फोटो शेअर केले जात आहेत
COMMENTS