राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

Admin
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापनदिना निमित्त सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोमेश्वरनगर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पश्चिम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज  सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या डिप्लोमा महाविद्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते
              शिबिराचे उदघाटन पंचायत समितीच्या सभापती नीता बारावकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, युवकचे अध्यक्ष राहुल वाबळे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, संचालक कौस्तुभ चव्हाण, सोमेश्वर चे उपाध्यक्ष शैलेश रासकर, शिक्षण मंडळाचे सचिव भारत खोमणे, गौतम काकडे, विक्रम भोसले,  
रमाकांत गायकवाड  संचालक किशोर भोसले, महेश ककडे नामदेव शिंगटे, विशाल गायकवाड, लालासाहेब माळशिकारे, बाळासाहेब काकडे,  लक्ष्मण गोफणे, ऋषी गायकवाड डॉ मनोहर कदम, प्राचार्य हजारे शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते. 
         दरवर्षी पक्षाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होतो मात्र कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. याचा विचार करून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या शिबीराचे आयोजन केले आहे. आज सोमवारी सकाळी ९ ते ३ यावेळेत हे शिबीर सोशल डिस्टंगसिंगचे नियम पाळून पार पडत आहे
To Top